शूटिंगमध्ये पाळावे लागणार हे 8 नियम | Film Shooting Rules | Lockdown 3.0 | Lokmat Cnx Filmy

2021-08-24 0

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु होताच सरकारने काही प्रमाणात शिथिलता देणे सुरु केले आणि याचसोबत मनोरंजन उद्योगानेही शूटींग पूर्ववत सुरु करण्याच्या दिशेने तयारी सुरु केली. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मनोरंजन उद्योग ठप्प पडला. नव्या मालिकांचे, सिनेमांचे शूटींग थांबले, आगामी सिनेमांचे प्रदर्शनही रोखले गेले़. मात्र आता लॉकडाऊनमध्ये आलेली शिथिलता बघता, मनोरंजन उद्योगाच्या जीवात जीव आला आहे, केवळ इतकेच नाही तर येत्या दिवसांत शूटींग सुरु झाल्यानंतर शूटींगची योजनाही तयार झाली आहे. येत्या जुलैपासून शूटींगची परवानगी मिळू शकेल, अशी आशा मनोरंजन विश्वाला वाटतेय. ही परवानगी मिळालीच तर अनेक निर्बंधासह शूटींग सुरु होणार आहे.

#LokmatNews #shootingrules #lokmatcnxfilmy
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber